Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्यात गारठा वाढला

राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तर मंगळवारी (ता. २०) किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. तर मंगळवारी (ता. २०) किमान तापमानात मोठी (Minimum Temperature) घट झाल्याने गारठा (Cold Weather) वाढला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २१) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होत धुळे येथे १० अंश, निफाड येथे १०.२, औरंगाबाद येथे १०.४ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान होता. तर रत्नागिरी राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पार आहे.

राजस्थानातील चूरू येथे मंगळवारी (ता. २०) देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज (ता. २१) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकतेय

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली निवळून गेली आहे. तर दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.३ (११.४), जळगाव ३०.६ (१२.०), धुळे ३०.० (१०.०), कोल्हापूर ३१.८ (१६.७), महाबळेश्वर २६.५(१३.२), नाशिक ३०.१ (१२.६), निफाड २९.६ (१०.२), सांगली ३२.४ (१४.६), सातारा ३०.३(१३.९), सोलापूर ३३.२ (१६.५), सांताक्रूझ ३३.५(२०.५), डहाणू ३२.९ (१९.५), रत्नागिरी ३५.० (१९.३), औरंगाबाद ३०.८ (१०.४), नांदेड २९.८ (१३.८), परभणी ३०.३ (१३.१), अकोला ३२.२ (१४.४), अमरावती ३१.४ (१३.८), बुलढाणा ३०.२ (१३.७), ब्रह्मपूरी ३२.२ (१३.८), चंद्रपूर २८.२ (१४.२), गडचिरोली २९.०(१२.२), गोंदिया ३०.५(१०.५), नागपूर २९.४ (१२.४), वर्धा २९.०(१३.०), यवतमाळ २८.५ (११.५).

---

फोटो आहे (agnMinTemp Forecast)

गुरूवारी (ता. २२) पहाटे साडे पाच वाजेपर्यंतच्या २४ तासांतील किमान तापमानाचा अंदाज दर्शवणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT