Wheat Crop Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : हवेतील गारव्यामुळे गव्हाचे पीक जोमात

मुबलक पाणी व वातावरणातील गारव्यामुळे गव्हाची उंची वाढून गव्हाची पिके तजेलदार दिसू लागली आहेत. यावर्षी करमाळा तालुक्यात पाऊस मुबलक झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाला पसंती दिली आहे.

Team Agrowon

पोथरे : उत्तर भारतातून आलेल्या थंडीमुळे वातावरणात (Cold weather) हुडहुडी भरली आहे. या थंडीचा मानवी जीवनावर परिणाम झाला असला तरी गव्हाचे पीक (Wheat Crop) मात्र जोमात डोलू लागले आहे.

मुबलक पाणी व वातावरणातील गारव्यामुळे गव्हाची उंची वाढून गव्हाची पिके तजेलदार दिसू लागली आहेत.

यावर्षी करमाळा तालुक्यात पाऊस मुबलक झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाला पसंती दिली आहे.

काही शेतकऱ्यांनी ऊस लावून उसावरील सरीवर गव्हाचे आंतरपीक घेतले आहे. मुबलक पाणी असल्याने गव्हाची उगवण क्षमता उत्तम प्रकारे झाली होती. अशातच थंडी सुटल्याने गव्हाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

या थंडीमुळे सध्या गव्हाची पिके हुरडा अवस्थेकडे वाटचाल करत असून झाडाची उंची व कुडीची लांबी उत्तम प्रकारे तयार झाली आहेत. त्यामुळे यावर्षी गव्हाला चांगले उत्पादन मिळणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

थंडी असेल तरच गव्हाचे पीक चांगले येते. यावर्षी कडाक्याची थंडी असल्यामुळे गव्हाची पिके चांगली आली आहेत. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात वाढ होणार असल्याचे रामभाऊ नलवडे, बाळेवाडी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT