Cloudy Weather  Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे रब्बीवर संकटाचे सावट

ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकाबाबत शेतकऱ्यांना चिंता

Team Agrowon

औरंगाबाद ः चार दिवसांपूर्वीपर्यंतचा रब्बीचा प्रवास सुखद राहिला असला तरी सध्या ढगाळ वातावरण व धुक्याची चादर रब्बी पिकांवरील (Rabbi Crops) संकट वाढवते आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख ६९ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी झाली.

ती सरासरीच्या १०३ टक्के आहे. दुसरीकडे लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत सरासरी १३ लाख ६३ हजार ९३१ क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात १६ लाख ११२ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या ११७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

त्यातही हरभऱ्याचे पीक सर्वाधिक क्षेत्रावर आहे. त्यामध्ये लातूर कृषी विभागातील ११ लाख १६ हजार १६३ हेक्टर व औरंगाबाद कृषी विभागातील ३ लाख १५ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचा समावेश आहे.

खास करून रब्बी ज्वारी, हरभरा, मका व गहू आदी प्रमुख पिकांवर हे संकट अधिक गडद असणार आहे.
रब्बीवरही कीड रोगांचे आक्रमण होते की काय अशी स्थिती आहे.

मराठवाड्यात पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरते आहे. या वातावरणामुळे मका, ज्वारी, गहू, हरभऱ्यासह फळ पिकांमध्ये डाळिंब, द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता राष्ट्रीय

कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रब्बीवर घोंगावणाऱ्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

चार ते पाच दिवसांपासून धुके पडते आहे. अपेक्षित थंडी नाही. अधूनमधून थंडी जाणवते आहे. कीड आणि रोगांना पोषक वातावरण आहे.
- सदाशिव गीते,
देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

धुक्याची चादर संकटात वाढ करते आहे. तिचा काळही वाढतो आहे. त्यात ढगाळ वातावरण रब्बीसह फळ पिकांवर कीड रोगांना आमंत्रण देणारेच आहे.
- अॅड. अमोल रणदिवे, उस्मानाबाद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य

Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध

APMC Investigation Report: बाजार समिती चौकशी अहवाल मोघम, त्रोटक

Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद

Cotton Farmer Issue: स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

SCROLL FOR NEXT