Drought Condition Maharashtra Agrowon
ताज्या बातम्या

Drought Condition Maharashtra : १५ जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ऑगस्ट महिन्यात भीषण परिस्थिती

Maharashtra Rain : ऑगस्ट या एका महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather : राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे मागच्या तीन महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील अनेक धरणांतील पाणी पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. ऑगस्ट या एका महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार १०२ वर्षात सर्वाधिक कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वात विदारक स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस झाला. तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील १५ जिल्ह्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या उणे २० टक्क्यांहून अधिक तूट आहे. जून महिना कोरडा गेला तर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. परंतु अचानक ऑगस्ट महिन्यात पाऊस थांबल्याने सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तर मागच्या तीन महिन्यात जालन्यात फक्त ५४ टक्के सांगली जिल्ह्यात ५६ टक्के, तर अमरावतीत जिल्ह्यात सरासरीच्या ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झालेले जिल्हे टक्केवारीत, औरंगाबाद ३१, बीड ३०, हिंगोली ३२, जालना ४६, धाराशिव २, परभणी २२, अकोला २८, अमरावती ३१, बुलढाणा २०, धुळे २१, नंदुरबार २०, अहमदनगर ३२, सांगली ४४, सातारा ३६ सोलापूर २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT