Khalapur Water Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Khalapur Water Scheme: पेयजल योजना मुंगूर तलावामुळे बंद

पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून, मोठ्या प्रमाणात मुंगूर माशांची पैदास केली जाते. नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे.

Team Agrowon

खालापूर : तालुक्यात पाताळगंगा नदीकिनारी असलेल्या तलावांमध्ये मुंगूर माशांची (Mungur Fish) पैदास केली जात आहे. या तलावातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी नदी सोडले जात असल्याने पेयजल योजनाच (Drinking Water Scheme) बंद पडली आहे.

मुंगूर मासे तलावावर कारवाईसाठी शिवलिंग वाघरे यांनी कारवाईसाठी वारंवार तक्रारी केल्या होत्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याकडे प्रशासनाचे लक्ष गेले आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी सहायक आयुक्त मत्स्य विभाग रायगड आणि पोलिस अधीक्षक रायगड यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, (Fish Farming) वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घातली आहे.

प्रतिबंधित मुंगूर माशांचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश असतानाही खालापूर तालुक्यात महड, कुंभिवली, चौक हद्दीत कोपरी गाव, पौध, माजगाव, मोहपाडा आणि खालापूर येथे मोठ्या प्रमाणात नदीकिनारी तलाव राजरोस सुरू आहेत.

पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून, मोठ्या प्रमाणात मुंगूर माशांची पैदास केली जाते. नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे.

तलावामधील मुंगूर माशांना सडलेले खाद्य खायला दिले जाते. यामुळे सर्व परिसर दुर्गंधीने भरून जातो.

तलावातील हेच घाण पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याची योजना पाताळगंगावर कार्यान्वित आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT