Agri University
Agri University Agrowon
ताज्या बातम्या

Agri University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला प्रारंभ

टीम ॲग्रोवन

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural College) आयोजित तीनदिवसीय शिवार फेरीला मंगळवारी (ता. १८) प्रारंभ झाला. शेतकरी सदन परिसरात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) व शेतकरी प्रतिनिधी दिलीप पोहाणे यांनी उद्‌घाटन केले. या वेळी आ. विप्लव बाजोरिया, (Viplav Bajoriya) कार्यकारी परिषद सदस्य दिलीप मोगल, संशोधन संचालक डाॅ. विलास खर्चे, डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. एस. एस. माने, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. ययाती तायडे, डॉ. राजेंद्र गाडे यांच्यासह विविध विभाग प्रमुख, शेतकरी उपस्थित होते.

या शिवार फेरीदरम्यान कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वेगवेगळे वाण, तंत्र, यंत्र शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रक्षेत्रावर संबंधित विभागांचे शास्त्रज्ञ उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहितीसुद्धा देत आहेत. पहिल्या दिवशी विदर्भातील अकोला, यवतमाळ, वर्धा व गडचिरोली या ४ जिल्ह्यांचे शेतकरी शिवार फेरीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बुधवारी (ता. १९) बुलडाणा, चंद्रपूर व नागपूर आणि गुरुवारी (ता. २०) वाशीम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर भेट आयोजित करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी आलेल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, भाजीपाला, यांत्रिकीकरण, तेलबिया, ज्वारी, कापूस आणि लिंबू वर्गीय फळे संशोधन केंद्राला भेटी देऊन माहिती घेतली. प्रत्येक प्रक्षेत्रावर नवनवीन वाण, यंत्र, तंत्राची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. कापूस संशोधन केंद्राच्या ठिकाणी ड्रोनने फवारणीचे प्रात्यक्षिकही एका कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. दुपारी तांत्रिक सत्रात मार्गदर्शनही करण्यात आले.

वर्ध्याच्या शेतकऱ्याला उद्‌घाटनाचा मान

शिवारफेरीसाठी नोंदणी केलेल्यांपैकी एका शेतकऱ्यानेला उद्‌घाटनाचा मान मिळत असतो. यंदा सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दारोडा (ता. हिंगणघाट) येथील शेतकरी दिलीप पोहाणे यांच्या हस्ते फित कापून उद्‌घाटन झाले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाने आणला व्यत्यय

शिवार फेरीदरम्यान पावसाचे आगमन झाल्याने व्यत्यय आला. सोमवारी रात्री या भागात जोरदार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळी काही काळ वातावरण चांगले होते. मात्र दुपारी अचानक पावसाने ठाण मांडले. संततधार पाऊस सुरू झाल्याने शिवाय फेरीमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेटी देण्यास अडचणी निर्माण झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT