Dr. Kiran Kokate Agrowon
ताज्या बातम्या

MPKV Rahuri : डॉ. किरण कोकाटे यांची सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड

डॉ. किरण कोकाटे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण असून, त्याआधी पाच वर्षे ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.

Team Agrowon

MPKV Rahuri नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (MPKV, Rahuri) माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे (Dr. Kiran Kokate) यांची जोधपूर, राजस्थान येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्था (काझरी) येथे संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्षपदी निवड झाली आहे. परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी तीन वर्षांसाठी ही निवड केली आहे.

डॉ. किरण कोकाटे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण असून, त्याआधी पाच वर्षे ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेतील उपमहासंचालक हे पद केंद्राच्या कृषी मंत्रालयातील अतिरिक्त सचिवाच्या समकक्ष असलेल्या पदावर नियुक्त झालेले ते महाराष्ट्र राज्यातील पहिले अधिकारी ठरले आहे.

राष्ट्रीय पातळीवर विविध समित्यांवर ते अध्यक्ष व सदस्य म्हणून काम बघत आहेत. सध्या ते पटणा येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन संकुलावर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे तसेच देशात नवीन कृषी सेवा केंद्रांच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे.

‘निक्रा’च्या तज्ज्ञ सल्लागार समितीवर देखील ते सदस्य म्हणून ते आपले योगदान देत आहेत. २००९ मध्ये त्यांची उपमहासंचालक पदावर निवड झाली होती.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील ६३७ कृषी विज्ञान केंद्राचे नेतृत्व करून त्या अंतर्गत असलेले दहा हजार प्रकल्प समन्वयक आणि विषय विशेषज्ञांद्वारे देशाच्या कृषी विस्ताराला नवी दिशा दिली.

त्यामुळेच केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्थेच्या (काझरी) संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT