Downy Mildew Grape Agrowon
ताज्या बातम्या

Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

शेतकरी हतबल; सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे दीड लाख एकर क्षेत्र

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच वाढती आर्द्रता (Increased Humidity) यामुळे द्राक्षावर भुरी आणि पसऱ्या डाऊनीचा प्रादुर्भाव (Downy Mildew Outbreak On Grape) काही प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे दीड लाख एकरांवर क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बागेला पोषक असे वातावरण असल्याने द्राक्ष बागेच्या काड्या चांगल्या तयार झाल्या आहेत. फुटवाही चांगला आहे. आगाप फळ छाटणी मिरज, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने घेतली जाते. फळ छाटणीची तयार शेतकरी करू लागला आहे. स्थानिक मजूरांसह परराज्यातील मजूर येत्या पंधरा ते वीस दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर फळ छाटणीस प्रारंभ होईल. पोषक वातावरण असल्याने यंदा बागेतून अपेक्षित उत्पन्न मिळेल, अशी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमझिम तर कधी हलका, तर कधी मोठा पाऊस पडत आहे. त्यातूनही सातत्याने हवामानात बदल होत असल्याचे दिसते आहे. परिणामी आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे बदलते वातावरण द्राक्ष बागेला धोकादायक बनले आहे. यामुळे द्राक्ष पट्ट्यात काही ठिकाणी पसऱ्या डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर काही ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. सध्या काड्या सशक्त असल्याने डाऊनी आणि भुरीचा प्रादुर्भाव झाला तर त्या अशक्त होण्याची भीती निर्माण होत आहे. परिणामी काड्या अशक्त झाल्या तर त्यामध्ये अपेक्षित अशी गर्भधारणा होणार नसल्याची भीती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे आर्द्रता वाढली असल्याने यामुळे बागेवर पसऱ्या डाऊनी आणि भुरीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
मारुती चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT