Cashew  Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Mandal : काजू मंडळाचे आजरा किंवा चंदगडला विभागीय कार्यालय

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव; अन्य तालुक्यांचाही होणार विचार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Cashew News : मुंबई : कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड या दोन तालुक्यांसाठी लागू करण्यात आलेल्या काजू फळपीक विकास योजनेंतर्गत (Cashew Fruit Crop Development Scheme) आजरा किंवा चंदगड या तालुक्यांत विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन ठिकाणी विभागीय कार्यालये सुरू करण्यात येणार होती. ही दोन ठिकाणे आणि चंदगड व आजरा या दोन तालुक्यांतील अंतर शेकडो किलोमीटरचे असल्याने काजू उत्पादक, उद्योजकांसाठी ते गैरसोयीचे होते.

त्यामुळे या दोन तालुक्यांपैकी एका ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पणन विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी दिली.

कोकणासह आजरा आणि चंदगड या तालुक्यांत काजूचा ब्रँड तयार करून त्याची प्रसिद्धी व जाहिरात करण्यासह काजू पिकास मिळालेल्या जी. आय. मानांकनाचा विस्तार करून मंडळाची वेबसाइट तयार करण्यात येईल.

काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वर्गांचे हे मंडळ आयोजन करेल. कोल्हापूर जिल्ह्यात विभागीय कार्यालय झाल्यास उद्योजकांसह उत्पादकांना मोठा फायदा होईल.

भुदरगड, राधानगरीचा समावेश हवा
आजरा, चंदगड, भुदरगड आणि राधानगरीचा पश्चिमेकडील भाग हा कोकणाला लागून आहे. या ठिकाणी काजू, आंबा, फणस आणि अन्य कोकणातील फळपिके मोठ्या प्रमाणात येतात.

सध्या काजू मंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड या दोनच तालुक्यांचा समावेश केला आहे. मात्र, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील काजू उत्पादकांसाठी या मंडळाचा लाभ झाला पाहिजे. त्यामुळे या दोन तालुक्यांचा समावेशदेखील करण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT