Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीक कर्जातील ५० टक्के रक्कम जिल्हा बँक रोखीने देणार

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकरी सभासदांना थेट कर्जवितरण करण्यात येत असे, मात्र आता विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फतही कर्जवितरण करण्यात येईल.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकरी सभासदांना थेट कर्जवितरण करण्यात येत असे, मात्र आता विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फतही कर्जवितरण करण्यात येईल. तसेच पीक कर्जाची ५० टक्के रक्कम रोखीने देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

या समस्येबाबत ‘अॅग्रोवन’ने मुख्य पृष्ठावर ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल संचालकांनी घेतली व शेतकरी पूरक निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे कुठेही एटीएम नाही. परंतु पीककर्ज रोखीने किंवा बँकेच्या शाखेतून रोकड स्वरूपात शेतकऱ्यांना मिळत नव्हते. कर्जाची रक्कम काढण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना एटीएम कार्ड दिले होते.

त्याचा उपयोग खासगी बँका व इतर एटीएममध्ये करून रक्कम काढावी लागायची. त्यात बँकेने बदल केला असून, ही रक्कम ५० टक्के रोखीने देण्याचा निर्णय घेतला. याबाबत बँकेच्या संचालकांची नुकतीच मासिक बैठक किंवा सभा झाली. त्यात अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष अमोल पाटील व इतर संचालक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला.

उसाच्या कर्जासाठी आता कारखान्याची हमीची गरज राहणार नाही. तर जिल्ह्याच्या सीमेच्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याची जमीन जिल्ह्याच्या हद्दीबाहेर असली, तरी त्यांना कर्ज वितरण करण्यात येईल.

सभासदांच्या मागणीवरून कर्जाचे वितरण विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फतही करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांना थेट बँकेमार्फत कर्ज घ्यायचे आहे, त्यांना इच्छेनुसार हा पर्यायही खुला ठेवण्याचा निर्णय झाला.

जिल्ह्याच्या सीमेबाहेरील जमीनधारकांनाही कर्ज

जिल्ह्यातील सीमेलगत काही शेतकरी राहतात. ते जिल्ह्याच्या हद्दीत राहात असले, तरी त्यांची जमीन सीमेबाहेर दुसऱ्या जिल्ह्यात आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्ज मिळत नसे. आता हा नियम रद्द करण्यात आला असून, जिल्ह्याच्या सीमेबाहेर शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वितरण करण्यास एकमताने सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT