Forest Encroachment Agrowon
ताज्या बातम्या

Forest Encroachment : तळोदा तालुक्यातील १०८ पट्टेधारकांना आदेशाचे वितरण

तळोदा तालुक्यातील १०८ वन अतिक्रमण पट्टेधारकांचे वनजमिनीचे पट्टे जिल्हास्तरीय वन समितीकडून मंजूर

टीम अॅग्रोवन.

तळोदा, जि. नंदुरबार ः तळोदा तालुक्यातील १०८ वन अतिक्रमण पट्टेधारकांचे वनजमिनीचे पट्टे जिल्हास्तरीय वन समितीकडून (Forest Committee) मंजूर करण्यात आल्याने या जमिनीचे आदेश त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. जमिनीचा ताबा मिळाल्याने वन अतिक्रमणधारकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

तालुक्यातील ग्रामीण भागातील वनजमीन अतिक्रमण पट्टेधारकांनी आपले प्रस्ताव शासनाच्या निकषानुसार कागदपत्रांच्या पूर्ततेसह गावपातळीवरील वन समित्यांमार्फत येथील महसूल प्रशासनाकडे दाखल केले होते. या समितीने प्रस्तावातील कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा प्रशासनाचा अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वनसमितीकडे पाठविले होते.

साधारण प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानंतर संबंधित समितीने शासनाचा वनजमीन अतिक्रमणाच्या ठरवून दिलेल्या पुराव्याची पडताळणी केल्यानंतर १०८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे आदेश उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते वनपट्टेधारकांना वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार गिरीश वाखारे, नायब तहसीलदार एस. व्ही. अहिरराव उपस्थित होते.

वनपट्टेधारकांची तहसील कार्यालयाबाहेर गर्दी

गेल्या ३५-४० वर्षांपासून वनजमीन कसत होतो. मात्र वन विभागाने अतिक्रमित ठरविल्याने तिचा ताबा मिळत नव्हता. अनेक वेळा वन विभागाने हुसकावूनदेखील लावले होते. तथापि, शासनाने वनाधिकार कायदा केल्याने आम्हाला आता आमची हक्काची जमीन मिळाली आहे. साहजिकच आम्हाला प्रचंड आनंद झाल्याचे काही उपस्थित वनजमीन अतिक्रमणधारकांनी सांगितले. आदेश घेण्यासाठी या वनजमीन पट्टेधारकांनी तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा, ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत ४,३७२ कोटी मदत जमा

Ahilyanagar Politics : सर्वपक्षीय राजकीय ‘आपलेपणा’ फक्त बॅंकेपुरता की पुढेही राहणार?

Satara Sugarcane Protest : साताऱ्यात ऊसदर आंदोलन पेटले! महामार्ग पूर्णपणे ठप्प

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा आवाहनाचा व्हिडिओच झाला भलताच ट्रोल!

ST Bus NCMC Card: एसटी प्रवास करणाऱ्या महिलांना दिलासा; एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT