E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E- Peek Pahani : केज तालुक्यात ई-पीकपाहणी करण्यात ‘व्यत्यय’

शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंद केल्यास अचूक पीकनिहाय पेरणी क्षेत्र शासनाला उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने विविध माध्यमांतून प्रचार करून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी, यासाठी जनजागृती केली.

Team Agrowon

केज, जि. बीड : सातबारावर पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्यांनी करावी, यासाठी राज्य शासनाने (State Government) ई- पीकपाहणी (E- Peek Pahani) सुरू केली आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी करण्यात अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी (Farmer) त्रस्त झाले आहेत.

मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने ई-पीकपाहणी अभियान राबविण्यास सुरुवात केली. यात शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वतःच आपल्या शेतातील पिकांची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंद केल्यास अचूक पीकनिहाय पेरणी क्षेत्र शासनाला उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने विविध माध्यमांतून प्रचार करून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी, यासाठी जनजागृती केली.

त्यामुळे पीक पेरा नोंदविण्यासाठी ई-पीक पाहणी हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने ज्या क्षेत्राची ई-पीक पाहणी केली जाणार नाही, ते क्षेत्र पडीत ग्राह्य जाणार आहे. अशा क्षेत्राला शासकीय मदत, पीकविमा आदी लाभास मुकावे लागणार आहे.

सध्या रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरू आहे. यासाठी पंधरा जानेवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र सध्या ई-पीक पाहणी करण्यात अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ॲपमध्ये लॉगीन करण्यास दहा ते पंधरा मिनिटे प्रतीक्षा करावी लागत आहे. आठ दिवस झाले तरीही बऱ्याच शेतकऱ्यांची नोंद सातबारावर दाखवत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT