Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Abdul Sattar Latest Update : धाडप्रकरणी सत्तार यांच्यावर नाराजी

Agriculture Latest News : अकोला येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करत जाब विचारला.

Team Agrowon

Mumbai News : अकोला येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करत जाब विचारला. विशेष म्हणजे सत्तार यांनी यावर केलेला खुलासासुद्धा ऐकून घेतला नाही.

खासगी व्यक्तीला घेऊन तुम्ही छापा कसा टाकू शकता, असा प्रश्‍न मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तार यांना केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे मंगळवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोगस बियाण्यांबाबत चर्चा सुरू असताना अकोला येथे कृषी विभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या धाडी आणि या प्रकरणात सत्तार यांच्या स्वीय सहायकाचे नाव जोडले गेल्याचा मुद्दा चर्चेला आला.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तार यांना विचारणा केली असता, त्यावर सत्तार आपल्या स्टाइलने खुलासा करत होते. मात्र अधिक ऐकून न घेता कार्यपद्धतीत सुधारणा करा, असे सांगत सत्तार यांना थांबविले.

अकोला येथील कथित धाडीत सत्तारांचा स्वीय सहायक दीपक गवळीचा समावेश असल्याचे सांगितले जातेय. एकीकडे मंत्रिपदावरून डच्चू देणार असल्याच्या चर्चा आणि दुसरीकडे कथित धाडप्रकरणामुळे सत्तार अडचणीत आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक

बोगस बियाण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात येणार आहे. या पथकात कृषी, महसूल आणि गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

याबाबत तातडीने कार्यवाही करून पथकांची निर्मिती करावी अशी सूचना बैठकीत करण्यात आली. तसेच दोन दिवसांत मुख्य सचिव मनोज सौनिक दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT