Water Management Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : पाण्याच्या नियोजनाचा लेखी खुलासा करा

Irrigation Department : पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर, स्मिता माने व इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील सध्याचा धरणातील पाणीसाठा व येणाऱ्या हंगामासाठी शेतीसाठी पाण्याचे नियोजन तसेच काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याचे काय नियोजन केले आहे, याचा लेखी खुलासा करावा, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर, स्मिता माने व इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. विक्रांत पाटील म्हणाले, की गतवर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला होता. किमान ३० जूनपर्यंत सर्वच घटकांसाठी पाणी पुरेल, अशी स्थिती होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या नियोजनामुळे धरणातील साठा कमी केला.

परिणामी यंदा मे व जून महिन्यात शेतीसाठी उपसाबंदी करावी लागली. यंदा पाऊस चांगला झाला आहे, धरणे भरली आहेत. त्यानुसार या हंगामात शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करणार आहात हे सांगावे. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, की दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी निधीची तरतूद नसताना ५ ते ६ टीएमसी पाणी सोडून दिले.

गळती निघालीच नाहीच. या उलट कोल्हापूरवर पाणीबाणीचे गंभीर संकट ओढवले होते. या वर्षी गळती काढण्यासाठी पाणी सोडायचे झाल्यास ते पाणी गैबी बोगद्यातून प्रथम पंचगंगा नदीत सोडावे म्हणजे राधानगरी धरणातील पाणी शिल्लक राहील. त्या पाण्याचा वापर करता येईल, असे नियोजन व्हावे.

जादा पाणी पंचगंगेत सोडण्याचे नियोजन करू

अधीक्षक अभियंता म्हेत्रे यांनी दूधगंगा धरणात जादा २ टीएमसी पाणी साठविण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी तपासून व वरिष्ठ पातळीवर परवानगी घेऊन जादा पाणी साठविण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या धरणातील जादा पाणी प्रथम गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत सोडण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT