Dhananjay Munde Agrowon
ताज्या बातम्या

Dhananjay Munde : धनंजय मुंडे अपघातात जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे मंगळवारी (ता.३) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास मतदारसंघातील दौरा आटपून शहरातून घराकडे जात असताना चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला

Team Agrowon

परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे मंगळवारी (ता.३) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास मतदारसंघातील दौरा आटपून शहरातून घराकडे जात असताना चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला.

त्यामुळे झालेल्या अपघातात धनंजय मुंडे जखमी झाले. त्यांच्यावर येथे खासगी रुग्णालयात उपचार करून बुधवारी (ता. ४) दुपारी १ च्या सुमारास अँब्युलंसने लातूर व लातूरहून एअर अँब्युलंसने मुंबई येथील ब्रिचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंडे हे मंगळवारी (ता.३) दिवसभर मतदारसंघातील विविध कार्यक्रमात सहभागी झाले. परत येत असताना परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील आझाद चौकात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन दुभाजकावर धडकले.

यात धनंजय मुंडे जखमी झाले. या अपघातात वाहनाच्या एअरबँग उघडल्याने मोठा धोका टळला. अपघातात वाहनाचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात स्वतः मुंडे यांनी समाज माध्यमांवर माहीत दिली.

‘‘अपघातात माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,’’ असे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT