Devendra Fadanavis Agrowon
ताज्या बातम्या

Supreme Court Decision on Shivsena : लोकशाही आणि लोकमताचा विजय झाला ; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadanavis On Supreme Court Decision : यावेळी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरी टीका केली आहे. आमचा विजय झाला आहे.

Team Agrowon

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षीत सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. पाच न्यायधिशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असले, तरी निकालात संपूर्ण सत्तासंघर्षाच्या प्रक्रियेवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरी टीका केली आहे. आमचा विजय झाला आहे. या निकालावर आम्ही समाधानी आहोत. असे म्हणत लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी

न्यायालयाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन परिस्थिती पूर्ववत करता येणार नसून उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे फडणवीस म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयाबाबतचा सर्वस्वी अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. तसेच निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत.

आयोग स्वतंत्रपणे यावर निर्णय घेऊ शकते. त्यामुळे आयोगाच्या निर्णयावर उध्दव ठाकरे गटाकडून जे दावे करण्यात आले होते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सत्तासंघर्षात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा संपूर्ण प्रकरणामध्ये कळीचा मुद्दा ठरला. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यावेळेची स्थिती पूर्ववत करू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

त्यामुळे सत्तासंघर्षादरम्यान सर्व प्रक्रिया चुकीची झाली असली, तरीही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणताही धोका बसलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT