ताज्या बातम्या

Government Grant : ‘क्षारपड जमीन सुधारणा’ अनुदानाची रक्कम जमा

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : ‘‘शिरोळ (kolhapur Sugar Mills) येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने (Sugar Mills) राबविलेल्या क्षारपड जमीन (Lomy Soil) सुधारणा प्रकल्प योजनेच्या कामातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून (Government Scheme) ११ कोटींपैकी दोन कोटी १७ लाख ८९ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा झाला आहे,’’ अशी माहिती दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत समस्याग्रस्त जमीन सुधारणा या उप-योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मंजूर झाली आहे. यामध्ये ६० टक्के केंद्र सरकार, तर ४० टक्के टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश आहे.

पाटील म्हणाले, ‘‘दत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३५ हजार एकर शेतीची जमीन नापीक व समस्याग्रस्त आहे. त्यापैकी आठ हजार एकर नापीक जमीन सुधारण्यासाठी काम सुरू आहे. प्रत्यक्षात तीन हजार एकर जमीन पिकाखाली आली आहे. जमीन सुधारणा होऊन या जमिनीत ऊस, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा भाजीपाला अशा पिकांचे उत्पादन सुरू झाले.’’

उर्वरित क्षारपड जमीन सुधारणा झालेल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे ‘‘२०१८ मध्ये शिरोळ तालुक्यातील शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेश वाडी, कुटवाड, घालवाड, औरवाड अशा सात गावांतील नापीक जमीन सुधारणा योजनेतील कामाचा प्रस्ताव प्रारंभी शासनाकडे पाठविण्यात आला.

अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित क्षारपड जमीन सुधारणा झालेल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच अनुदानही प्राप्त होईल,’’ असे पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून निषेध तर मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

Vegetable Market Rate : कोबी वधारला; काकडी उतरली, कांदा, बटाटा, लसूण स्थिर; आंबा स्वस्त

Agriculture Water Dams : कोल्हापुरातील मोठ्या धरणांत गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठी, वळीव पावसाने दिलासा

Lok Sabha Election 2024 : राज्यात ५ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT