Ujani Canal Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभाग भरपाईचा आधार देणार का?

पंचनाम्यानुसार एकूण १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ४० हेक्टर फळबागा, ६० हेक्टर बागायती क्षेत्र, तर पाण्याच्या प्रवाहाने २० हेक्टर क्षेत्रातील माती खरडून गेली आहे.

Team Agrowon

Crop Damage in Solapur District : पाटकूल (ता. मोहोळ) शिवारातील उजनी डावा कालवा फुटून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यात एकूण १३९ शेतकऱ्यांचे १२० हेक्टर क्षेत्रातील फळबागा व इतर पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

त्याची नक्की नुकसान भरपाईची रक्कम किती होते, त्यासाठी सर्व अहवाल कृषी विभागाकडे (Agriculture Department) दिला जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची भिस्त आता कृषी विभागावरच आहे.

यासंदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ जानेवारी) पहाटे पाटकूल शिवारात उजनीचा डावा कालवा फुटला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध फळबागा व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार बेडसे यांनी पंचनाम्यासाठी कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक व तलाठी यांचे संयुक्तिक पथके नेमली होती. त्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून पंचनाम्याचे काम पूर्ण केले.

पंचनाम्यानुसार एकूण १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ४० हेक्टर फळबागा, ६० हेक्टर बागायती क्षेत्र, तर पाण्याच्या प्रवाहाने २० हेक्टर क्षेत्रातील माती खरडून गेली आहे.

दोन शेततळी वाहून गेली आहेत, तर १५ विहिरी गाळाने भरल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व ठिबक सिंचन संचही वाहून गेले आहेत.

नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचे सात-बाराचे उतारे काढण्याचे काम सुरू आहे. तसेच अनेक सात-बारा उतारे हे समाईक आहेत, त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेसाठी पुन्हा तक्रारी होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?

PoCRA Phase 2: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्यासाठी १०० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

Indigenous Variety: आईच्या जपवणुकीला मुलाच्या प्रयोगाची साथ; गावरान वाणाची राष्ट्रीय नोंद

Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात

Shivendrasinghraje Bhosale: वार्षिक योजनेतील निधी अखर्चित ठेवू नका

SCROLL FOR NEXT