ताज्या बातम्या

हुमणी रोखण्यासाठी लौकी येथे प्रात्यक्षिक

लौकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांना हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळे बनविण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक दिपाली धीमते यांनी करून दाखविले.

टीम ॲग्रोवन

महाळुंगे पडवळ, जि. पुणे ः लौकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांना हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळे बनविण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक दिपाली धीमते यांनी करून दाखविले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी व मंडल कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांच्या सूचनेनुसार लौकी येथील शेतकरी धोंडीभाऊ मारुती थोरात यांच्या शेतात हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक धीमते यांनी करून दाखविले. या वेळी दगडू नामदेव थोरात, रवींद्र बाबूराव थोरात, संतोष नंदाराम थोरात, मंगेश दत्तात्रय काळे, विशाल संतोष थोरात यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘मॉन्सूनच्या सुरुवातीच्या काळात हुमणीचे प्रोढ भुंगेरे प्रजनाकरिता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. प्रामुख्याने कडुलिंब, बाभूळ, शेवगा या झाडांच्या पानावर उदरनिर्वाह करतात. एक भुंगेरा ५० ते ६० अंडी घालून अळ्यांची निर्मिती करतो. त्यामुळे ऊस व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सापळे लावून भुंगेरे नष्ट केल्याने उत्पत्ती थांबण्यास मदत होईल,’’ असे कृषी सहायक दीपाली धीमते यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT