Abdul Aattar Agrowon
ताज्या बातम्या

Abdul Sattar : शेतकरी, मजुरांच्या प्रश्‍नांवर निर्णायक भूमिका घेण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी निर्णायक भूमिका घ्या, अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

टीम ॲग्रोवन

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे प्रलंबित प्रश्न (Farmer's Issue) तत्काळ निकाली काढण्यासाठी निर्णायक भूमिका घ्या, अशी मागणी प्रशांत डिक्कर (Prashant Dikkar) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे केली. या मुद्द्यावर त्यांनी सत्तार यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले कपाशी, सोयाबीन, मका ही पिके सततच्या अतिवृष्टीमुळे निसर्गाने हिरावून घेतले गेले आहे. सरकारने दुप्पट दराने मदत जाहीर केली. पण पंचनामे मात्र गुंठ्याने केले ही केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे, असे डिक्कर यांनी सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने घोषणा केलेली रक्कम दसरा, दिवाळी तोंडावर आली असतानाही दमडी सुध्दा दिलेली नाही.

शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा, बुलडाणा जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, पीकविमा कंपनीने विना अट शेतकऱ्यांना विमा द्यावा, राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून शेतमजुरांना सर्व सवलती लागू करा, किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर शेतमजुरांना दरमहा ४ हजार रुपये मानधन लागू करा, या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढून निर्णायक भूमिका घ्यावी, असे प्रशांत डिक्कर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनात आणून दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT