Fertilizer Demand Agrowon
ताज्या बातम्या

खरीपासाठी तीन लाख मेट्रीक टन खताची मागणी

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे दोन लाख ९१ हजार ९०० टन खतांची मागणी नोंदविली आहे.

टीम ॲग्रोवन 

पुणे : पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची (Kharif Season) तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे दोन लाख ९१ हजार ९०० टन खतांची मागणी (Demand Of Fertilizer) नोंदविली आहे. तसेच गेल्या वर्षीचे ५१ हजार २५८ टन खते शिल्लक (Fertilizer) असून, खरिपासाठी मागणी केलेल्या खतांचे आवंटन (Fertilizer Allocation) मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ५ हजार १०८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी होण्याचा (Expected Sowing) अंदाज आहे. यामध्ये भाताच्या (Paddy) व सोयाबीनच्या (soybean) क्षेत्राच्या वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे कृषी विभागानेही (Agriculture Department) खताच्या अडचणी येऊ नये म्हणून नियोजन केले आहे. लवकरच कृषी आयुक्तालयाकडून या खतास मंजुरी मिळणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना या खताचा पुरवठा होणार आहे.

यंदा सरळ खतामध्ये युरिया, अमोनिअम, एमओपी आणि एस.एस.पी. अशा खतांचा समावेश होत असून, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. यंदा युरियाची एक लाख २५ हजार टन, डीएपी ५० हजार, एमओपी ३२ हजार, एसएसपी २२ हजार तर संयुक्त खतांमध्ये ६२ हजार ९०० टन खतांची मागणी केली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात खताची मागणी नोंदविली आहे. त्यानंतर कृषी विभागाने कमीअधिक प्रमाणात खताचा पुरवठा केल्याने काही वेळा टंचाई भासल्याची स्थिती होती. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खते शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात खतांची मागणी केली आहे. लवकरच या खताला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या जवळपास ५० टनांहून अधिक खते शिल्लक आहेत. त्यामुळे खरिपाच्या पेरणीवेळी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाही.
ज्ञानेश्वर बोठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT