APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बाजार समित्या निवडणुका स्थगित करण्याची मागणी

जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य मतदार आहेत. अशात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यात नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करावे की जुन्या सदस्यांनी मतदान करावे, असा कायदेशीर पेच आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (APMC Election) ग्रामपंचायतीचे सदस्य (Gram Panchayat Member) मतदार आहेत. अशात ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Election) होणार आहेत. यात नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करावे की जुन्या सदस्यांनी मतदान करावे, असा कायदेशीर पेच आहे.

त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्थगित कराव्यात किंवा पुढे ढकलाव्यात यासह विविध मुद्द्यांवर बाजार समितीचे माजी शासननियुक्त संचालक ॲड. किरण पाटील व नाथाजी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाला आहे.

सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. यात ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, व्यापारी, अडते, माथाडी, तोलाईदार, विविध सेवा संस्थांचे सदस्य हे बाजार समितीसाठी मतदार आहेत. त्यांची कच्ची मतदार यादी जाहीर केली. हरकती मागविल्या आहेत. त्याची छाननी झाल्यावर अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

याचवेळी जिल्ह्यात ३०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीच होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे विद्यमान दोन हजार ७०० सदस्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्य असतीलच, असे नाही (निवडणुकीत पराभव झाल्यास किंवा निवडणूक न लढविल्यास).

त्यामुळे जे ग्रामपंचायतीचे त्या वेळी विद्यमान सदस्य नाहीत, त्यांचे मतदान बाजार समितीच्या निवडणुकीत ग्राह्य धरणे बेकायदेशीर ठरू शकते. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांची नावेच बाजार समितीच्या सध्याच्या मतदार यादीत असणार नाहीत. त्यामुळे नव्या विद्यमान सदस्यांनी मतदान करणे मुश्कील आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT