Sanjay Jagtap Agrowon
ताज्या बातम्या

Drought Condition : पुरंदरमध्ये चारा डेपो सुरू करा ; आमदार संजय जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Rain Shortage : पुणे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये ठिकठिकाणी चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू करण्याची आमदार संजय जगताप यांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : यंदा पावसाने दडी मारल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी शासनाने पुरंदरमध्ये ठिकठिकाणी चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू करण्याची आमदार संजय जगताप यांनी केली आहे. याबाबत श्री. जगताप यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे, की पुरंदर तालुका अवर्षणप्रवण भागात येत असून तालुक्यातील पूर्व भागाला सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. लहरी पर्जन्यमानामुळे शेती व पिण्याच्या पाण्याकरिता या भागाला पुरंदर व जनाई उपसा सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

पुणे व धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने सिंचन योजनेद्वारे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस व मॉन्सूननेही अत्यल्प हजेरी लावल्याने पूर्व पुरंदरमध्ये खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या संसर्गजन्य लम्पी स्किन आजाराच्या प्रार्दुभावाबाबत योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून तालुक्यातील बिकट परिस्थितीची दखल घेऊन जनावरांकरिता चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करणे आवश्यक आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी-दौंड पुरंदर, कार्यालय सासवड, तहसीलदार पुरंदर, गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर, तालुका कृषी अधिकारी पुरंदर यांनाही पत्रे दिली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT