Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची मागणी

मनसे शेतकरी सेनेचे आमदार आहेरांना साकडे

Team Agrowon

सोग्रस : चांदवड तालुक्यातील गावांमध्ये परतीच्या पावसाने खरीप पिकांचे (Kharif Crop) अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकवता सरसकट हेक्‍टरी आर्थिक मदत देऊन पीकविमा (Crop Insurance) मंजूर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सोग्रस- शिरसाणे- भाटगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ०७ च्या रस्ता उद्‌घाटनासाठी आमदार डॉ. आहेर, डॉ. कुंभार्डे आले असताना मनसे शेतकरी सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने संपूर्ण चांदवड तालुका अक्षरश: झोडपून काढला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, भाजीपाला, द्राक्ष, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी सोयाबीन वाहून गेली. तर काही ठिकाणी सोयाबीनचे ढीग अजूनही पाण्यात आहेत. सोयाबीन व मका ही नगदी पिके मातीमोल झाली आहेत. २०२०, २०२१ व २०२२ ला सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत. परंतु,  अद्याप कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून पिकविम्याची रक्कम मंजूर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार, बागायतदार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये, तर फळबागायतदारांना प्रतिहेक्टर दीड लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी सेनेचे जिल्हा सरचिटणीस गोविंद गांगुर्डे, चांदवड तालुका संघटक दिगंबर गांगुर्डे, मनोज गांगुर्डे, सागर गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, किशोर घोलप, बाळा शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

Railway Infrastructure Expansion: माल वाहतुकीसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार : पुनीत अग्रवाल

Shepherd Migration: मेंढपाळांची दसऱ्यापूर्वीच भटकंती

Farmers Support: शेतकऱ्यांना संवादातून आधार

Fodder Conservation Campaign: चारा साक्षरतेसाठी गावपातळीवर जनजागृती, प्रशिक्षण मोहीम

SCROLL FOR NEXT