Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : शिंगाडेवाडीतील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण

Water Management : उगलेवाडी-फदालेवाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत, शाश्वत संस्था मंचर, सकाळ रिलिफ फंड व लोकसहभागातून शिंगाडेवाडी येथील सार्वजनिक तळ्याचे खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Pune News : उगलेवाडी-फदालेवाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत, शाश्वत संस्था मंचर, सकाळ रिलिफ फंड व लोकसहभागातून शिंगाडेवाडी येथील सार्वजनिक तळ्याचे खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे १३ लाख ५० हजार लिटरने पाणी साठवण क्षमता वाढली आहे. या पाण्याचा लाभ आंबेगाव व राजगुरुनगर तालुक्यांतील ९०० कुटुंबांना होणार आहे.

आंबेगाव व राजगुरुनगर तालुक्यांच्या सीमारेषेवर असलेल्या शिंगाडेवाडी येथे सार्वजनिक तळे आहे. परंतु उन्हाळ्यातील चार महिने या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे शाश्वत संस्था मंचर व ग्रामपंचायतीने सकाळ रिलिफ फंडापुढे ही समस्या मांडली. त्यानुसार १५ मीटर रुंदी, ४५ मीटर लांबी व २ मीटर उंची याप्रमाणे तळ्यात खोलीकरण करण्यात आले.

या कामामुळे शिंगाडेवाडीमधील ६०० व सुपेवाडीमधील ३०० कुटुंबांचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जनाबाई उगले, सरपंच विनोद उगले, उपसरपंच विलास उगले, शाश्वत संस्थेचे कोषाध्यक्ष अशोक आढाव, ग्रामपंचायत सदस्या मंगल शिंगाडे, बजरंग उगले, किसन भोजने, बंडू गाडेकर आदी उपस्थित होते.

‘‘तळ्याचे खोलीकरण केल्याने एकूण पाणी क्षमता २ कोटी ३५ लाख २० हजार झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कमी झाली आहे. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. त्याबद्दल सकाळ रिलिफ फंड व शाश्वत संस्थेचे विशेष आभार.
- जनाबाई उगले, माजी जिल्हा परिषद सदस्या, उगलेवाडी, ता. आंबेगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT