Sugarcane Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : वर्धा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात घट

वर्धा जिल्ह्यात जामणी येथे साखर कारखाना आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत देवळी, सेलू, वर्धा व आर्वी तालुक्‍यांत उसाखालील क्षेत्रात वाढ झाली होती.

Team Agrowon

वर्धा ः जिल्ह्यात साखर कारखान्यामुळे (Sugar Factory) ऊस लागवडीला (Sugarcane Cultivation) प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ऊसतोड मजुरांची (Sugarcane Labors) वानवा, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास या कारणांमुळे उसाखालील क्षेत्र (Sugarcane Acreage) सातत्याने कमी होत असल्याचे चित्र आहे.

वर्धा जिल्ह्यात जामणी येथे साखर कारखाना आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत देवळी, सेलू, वर्धा व आर्वी तालुक्‍यांत उसाखालील क्षेत्रात वाढ झाली होती.

शेतकऱ्यांना यातून चांगला पैसाही मिळत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर या भागातील परिस्थिती बदलेली अशी अपेक्षा व्यक्‍त होत होती.

परंतु वन्यप्राण्यांचा वाढता त्रास, ऊसतोडणी करिता मजुरांची वानवा, वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, दोन हजार हेक्‍टरवरील उसाचे क्षेत्र आता दीड हजार हेक्‍टरपर्यंत खाली आले आहे.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्‍टर)

सेलू ५०३.८०

वर्धा ५३१.२९

देवळी १५७.३०

आर्वी १७६.८०

आष्टी ४०.१०

कारंजा ४४.८०

हिंगणघाट ७७.६०

समुद्रपूर १३.३६

एकूण १५४८.२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT