Sugarcane Transport Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Transporter : ऊस वाहतूकदारांचा आज सांगलीत निर्णायक मेळावा

ऊसतोडणी मुकादमांकडून दरवर्षी होणारी कोट्यवधीची फसवणूक, त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, हे सत्र थांबले पाहिजे.

Team Agrowon

Sangli News : ऊसतोडणी मुकादमांकडून दरवर्षी होणारी कोट्यवधीची फसवणूक, त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, हे सत्र थांबले पाहिजे.

त्यासाठी ऊसतोडणी टोळी करार स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीकरण पद्धतीनेच झाले पाहिजेत, या मुख्य मागणीसाठी रविवारी (ता. १६) तरुण भारत क्रीडांगणावर दुपारी २ वाजता ऊसतोडणी वाहतूकदारांचा निर्णायक मेळावा होणार आहे.

स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि संघटना नेते पृथ्वीराज पवार या वेळी निर्णायक आंदोलनाची घोषणा करणार आहेत. शेकडो वाहतूकदार या मेळाव्याला उपस्थित राहतील, अशी माहिती निमंत्रक संदीप राजोबा यांनी दिली.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दुपारी २ वाजता रॅली निघेल. तेथून तरुण भारत क्रीडांगणावर मेळावा होईल. सुनील शिष्टे, प्रवीण शेट्टी, विनोद पाटील, सुदर्शन माद्वाण्णा, राहुल सकळे आदी नियोजन करत आहेत.

...अशा आहेत मागण्या

- नोंदणीकृत वाहतूकदार, मजूर व मुकादमांशीच कारखान्यांनी करार करावा

- सर्व कारखान्यांचे करार एका नमुन्याचे असावेत

- महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखाने व सरकारने समन्वय राखून फसवणुकीला अटकाव करावा

- ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांच्याविरुद्ध कडक पोलिस कारवाई करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT