Silk Farming agrowon
ताज्या बातम्या

Silk Farming : तुती रेशीम बीज दरात सुधारणा करण्याचा निर्णय

केंद्रीय रेशीम मंडळाने बीज कोषाचे दर प्युपेशन टक्केवारीनुसार वाढविल्याने शेतकऱ्यांच्या बीज कोषांचा दर कमी मिळत आहे, त्यामुळे अंडीपुंज निर्मितीकरिता खरेदी करण्यात येणारी तुती रेशीम बीज दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

मुंबई : केंद्रीय रेशीम (Silk farming) मंडळाने बीज कोषाचे दर प्युपेशन टक्केवारीनुसार वाढविल्याने शेतकऱ्यांच्या बीज कोषांचा दर कमी मिळत आहे, त्यामुळे अंडीपुंज निर्मितीकरिता खरेदी करण्यात येणारी तुती रेशीम बीज दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर ९५० ते एक हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्रामार्फत अंडीपुंज पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी बीज कोषांची आवश्यकता असते. त्याकरिता म्हैसूर येथून सीड अंडीपुंज आणून स्थानिक बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येतो.

या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बीज कोष गडहिंग्लज येथील केंद्रामार्फत खरेदी केले जातात. त्या कोषांतून अंडीपुंज तयार केले जातात. सध्या रेशीम संचालनालयाने प्युपेशन टक्केवारीनुसार ६०० ते ६५० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे शेतकऱ्यांकडून तुती रेशीम बीज कोष खरेदी केली जातात.

प्युपेशन टक्केवारीनुसार दर निश्चित

सध्या स्थानिक शेतकऱ्यांच्या बीज कोषांना मिळणारा दर हा केंद्रीय रेशीम मंडळाच्या दरापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे बीज कोषांना मागणी नाही. त्याचा परिणाम अंडीपुंज निर्मितीवर होत आहे. त्यामुळे रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी बीज कोषाच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ८० प्युपेशन टक्केवारीसाठी ९५० रुपये तर ९६ प्युपेशन टक्केवारीच्या वर एक हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT