Loan Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Loan Scheme : थेट कर्ज योजनेसाठी इच्छुकांना अर्जासाठी २० डिसेंबरची मुदत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज वितरण २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, कागदपत्रांच्या पूर्ततेसह २० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत (Loan Scheme) कर्ज मागणी (Loan Demand) अर्ज वितरण २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, कागदपत्रांच्या पूर्ततेसह २० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

तरी मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आहे, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा रक्कम एक लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाचा हिस्सा ८५ हजार रुपये, अनुदान रक्कम दहा हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग पाच हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये कर्ज देण्यात येते. तीन वर्षे (३६ महिने) कालावधीसाठी

दर साल दर शेकडा चार टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज रक्कम वितरित करण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण ६५ लाभार्थींचे ६५ लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तरी इच्छुकांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बिग बजार समोर, सोलापूर येथे स्वत: प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट कऱण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT