Ashadhi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari : श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास खुले

कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) येणाऱ्या जास्तीत जास्त वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन (Vitthal Rukmini Darshan) मिळावे, यासाठी गुरुवारपासून (ता.१) आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन २४ तास खुले करण्यात आले आहे. त्यामुळे रोज किमान एक लाख वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.

कोरोनानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. यात्रा काळात १५ दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते.

एक जुलैपासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शन रांगेत कायमस्वरूपी ४ आणि तात्पुरती ६ असे एकूण दहा पत्राशेड उभी करण्यात आली आहेत. तसेच मंदिरावरही आकर्षक आणि लक्षवेधी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT