Grape  Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Damage : माथेफिरूकडून ऐन हंगामात द्राक्ष बागेचे नुकसान

निफाड तालुक्यातील उगाव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे यांनी दोन वर्षापूर्वी शेत मिळकत गट नं.१५०/१ मध्ये तीन एकर क्षेत्रावर नानसाहेब परपल या काळ्या वाणाची लागवड केली होती.

टीम ॲग्रोवन

निफाड, जि. नाशिक : तालुक्यातील उगाव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे या द्राक्ष उत्पादक (Grape Producer) शेतकऱ्याच्या तयार द्राक्ष बागेतील ७० वेलींवर अज्ञात व्यक्तीने घाव घालत नुकसान (Grape Crop Damage) केल्याची घटना समोर आली आहे. ऐन द्राक्ष हंगामाच्या तोंडावर तयार झालेली द्राक्ष बाग उद्‌ध्वस्त केल्याने मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पट्ट्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निफाड तालुक्यातील उगाव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे यांनी दोन वर्षापूर्वी शेत मिळकत गट नं.१५०/१ मध्ये तीन एकर क्षेत्रावर नानसाहेब परपल या काळ्या वाणाची लागवड केली होती. या द्राक्ष बाग उभारणी व पीक व्यवस्थापन कामी त्यांनी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

द्राक्ष बागेची मशागत करून चालू हंगामात द्राक्ष बागेवर पहिले पीक आले होते. खत, सिंचन, पीक संरक्षण करून जोमदार बाग उभी होती. असे असताना द्राक्ष बागेतील सुमारे ७० वेली मुळापासून तोडून टाकल्याची बाब गुरुवारी (ता. १५) सकाळी पानगव्हाणे यांच्या निदर्शनास आली.

द्राक्ष बागेत नियमित पाहणीकरिता गेले असता पानगव्हाणे कुटुंबाला द्राक्षघडसुकलेले दिसले. त्या वेळी बारकाईने पाहणी केल्यावर द्राक्ष बागेच्या मुळावरच घाव घातल्याचे दिसून आले. अनपेक्षितरीत्या घडलेल्या या घटनेमुळे पानगव्हाणे परिवार अडचणींत आला आहे. घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे .

अनेक संकटांतून द्राक्ष बागा उभ्या कराव्या लागतात. त्यावर लाखोंचा खर्च केला जातो. आलेल्या पिकावर द्राक्ष बागायतदारांचे भवितव्य असते; मात्र अशा घटनेमुळे द्राक्ष बागेचे झालेले नुकसान हे निषेधार्ह आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे.

- अॅड. रामनाथ शिंदे, संचालक-महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

उगाव येथील द्राक्ष बागायतदार विष्णुपंत पानगव्हाणे यांची द्राक्षाची ७० झाडे माथेफिरूने तोडून नुकसान केले. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी व नुकसान भरपाई मिळावी.

- संजय पाटोळे, शेतकरी, शेतकरी संघर्ष संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT