Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा

१९ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने दिलेल्या अहवालात हा अंदाज वर्तवित जिल्ह्यात पाच तालुक्यांत तूर, कपाशी, सोयाबीन पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये अमरावती विभागात सर्वाधिक नुकसान अकोला जिल्ह्यात झाले आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain Akola) सुमारे ४१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) केले आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने दिलेल्या अहवालात हा अंदाज वर्तवित जिल्ह्यात पाच तालुक्यांत तूर, कपाशी (Cotton Crop Damage), सोयाबीन पिकांचे नुकसान (Soybean Crop Damage) दर्शविण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये अमरावती विभागात सर्वाधिक नुकसान अकोला जिल्ह्यात झाले आहे.

जिल्ह्यात साधारणपणे पाच ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. १० ऑक्टोबरपासून या पावसाचा जोर आणखीच वाढला. यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्याच्या काळात सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली होती. काहींची सोयाबीन काढून तयारही झाली. मात्र मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची सोंगणी केली जाऊ लागली होती.

अशातच सतत आलेल्या पावसाने व्यत्यय निर्माण केला. सोंगणी केलेले सोयाबीन पाण्यात भिजले. काही ठिकाणी सोयाबीनचे ढीग शेतकऱ्यांनी लावले होते. परंतु या ढिगांखालून पाणी वाहिले. त्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला, अकोट आणि पातूर या पाच तालुक्यांत पावसाने ४१ हजार १८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके पावसाने खराब केली असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे.

बाजारात दर कमी

पावसाने भिजलेले सोयाबीन मळणी करून शेतकरी घरोघरी सुकवत आहेत. पावसाचा फटका बसल्याने या सोयाबीनचा दर्जा काहीसा खालावला आहे. व्यापारी या सोयाबीनला अवघे साडेतीन हजारांपासून दर मागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अशीच गत ओल्या झालेल्या कापसाची आहे. पावसात भिजलेला कापूस आता वेचणी करून शेतकरी घरी आणत आहेत. त्याला वाळवून विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे नेत असताना पाच ते सात हजारांदरम्यान व्यापारी मागणी करू लागले. दोन्ही प्रमुख पिकांचे दर अशा पद्धतीने पाडल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी चिंतातूर झालेला आहे.

१९ ऑक्टोबरपर्यंत विभागातील नुकसान

अकोला ४१,१८० हेक्टर

अमरावती १५,८१०

बुलडाणा १२,०६२

यवतमाळ १२,३१७

वाशीम ३,१२३ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT