Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Exotic Vegetable : पावसामुळे एक्झॉटिक भाजीपाला उत्पादक पट्ट्यात नुकसान

Crop Damage Due To Rain : जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये एक्झॉटिक भाजीपाला उत्पादन गेल्या काही वर्षात घेतले जात आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये एक्झॉटिक भाजीपाला उत्पादन गेल्या काही वर्षात घेतले जात आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या लागवडी असतात.

मात्र चालू हंगामात काढणीच्या अवस्थेतच भाजीपाला असताना झालेल्या पावसामुळे कंदेवर्गीय व पालेभाजीवर्गीय पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यासह मागणी असतानाही भाजीपाल्याचे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव, वडगाव, अटकवडे, डूबेरे परिसरात शेतकरी जवळपास १.५ हजार एकरवर एप्रिल, मे व जून महिन्यात टप्प्याटप्प्याने लागवडी करतात. पाण्याच्या अडचणी असतानाही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने ही पिके जगवली होती.

त्यासाठी उत्पादन खर्च करण्यासह मेहनत घेतली. मात्र काढण्याच्या अवस्थेत झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसल्याने नुकसान वाढले आहे. कंदवर्गीय पिकांमध्ये चायना कॅबेज, ब्रोकोली ही पिके खराब होऊन सडली आहेत. तर पालेवर्गीय पिकांमध्ये पेपचोय, रोमन या पिकांचे प्रमुख नुकसान आहे.

मागणी असूनही पुरवठा अडचणीत

लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी ४५ ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च येत असतो. मात्र असे असताना या भागातील भाजीपाला काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अगोदरच पाऊस उशिरा आला.तो कमीच आहे. मात्र पिकांसाठी नुकसानकारक ठरला आहे.त्यामुळे यंदा तीन लाख रुपये उत्पादन खर्च वाया गेला. तर हाती आलेले १५ ते २० लाख अपेक्षित उत्पन्न असताना मोठी हानी झाली आहे.
-कारभारी सांगळे, एक्झॉटिक भाजीपाला उत्पादक,वडगाव, ता.सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT