Water Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Rural Water Supply : रोजंदारी पाणीपुरवठा कमर्चाऱ्यांना अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास गुरुवारी (ता. १७) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

टीम ॲग्रोवन

मुंबई : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील (Rural Water Supply Scheme) रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास गुरुवारी (ता. १७) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, नगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांतील ५४७ सेवानिवृत्त व ३४७ कार्यरत कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार असून, यासाठी २४ कोटी ४ लाख रुपये इतक्या खर्चास व थकबाकीपोटी येणाऱ्या ५० कोटी १ लाख रुपये इतक्या राखीव खर्चास मान्यता देण्यात आली.

पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पाणी पुरवठा योजना तयार केल्यानंतर योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येते. अशा योजनेवरील कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना जिल्हा परिषदेकडून वेतन देण्यात येते. विविध कारणास्तव या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना पुरेसे व वेळेवर वेतन अदा न झाल्याने पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे चालविण्यास मर्यादा येत आहेत.

रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांकडून विविध न्यायालयांमध्ये उपस्थित प्रकरणामध्ये दिलेले आदेश, कालेलकर आयोगाच्या शिफारशी, पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे दायित्व उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT