Fish Market  Agrowon
ताज्या बातम्या

Fish Market : सुक्‍या मासळीतून रोज लाखोंची उलाढाल

खोपोलीजवळ ताकई-साजगाव परिसरात कार्तिकी एकादशीपासून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली बोंबल्या विठोबाची यात्रा सुरू आहे. पंधरा दिवस चालणारी कोकण विभागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे.

Team Agrowon

खोपोली ः खोपोलीजवळ ताकई-साजगाव परिसरात कार्तिकी एकादशीपासून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली बोंबल्या विठोबाची यात्रा सुरू आहे. पंधरा दिवस चालणारी कोकण (kokan) विभागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे. धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या यात्रेत सध्‍या भाविकांची गर्दी वाढली आहे.

येथील सुक्‍या मासळीचा बाजार (Fish Market) कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्‍यात प्रसिद्ध असून दररोज लाखोंची उलाढाल होते. यंदा गतवर्षीपेक्षा तुलनेत दर १० ते १५ टक्‍यांनी वाढल्‍याचे व्यापारी सांगतात.

साजगावच्या यात्रेला पंचक्रोशीत अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. संत तुकारामच्या येथील वास्तव्याशी व त्याकाळी घडलेल्या काही घटनाक्रमांशी या यात्रेचा संबंध असल्याचे जुने-जाणते सांगतात. यात्रेत यंदा सुक्‍या मासळीची ५० हून अधिक दुकाने लावण्यात आली असून मिठाईची दुकानेही तेवढीच आहेत.

केवळ सुक्‍या मासळीच्या खरेदीसाठी संपूर्ण खालापूर तालुक्‍यासह पेण, कर्जत, अलिबाग, पनवेल, ठाणे, पुण्यातील खवय्ये आवर्जून गर्दी करतात. यात्रेत बोंबील, सुकट, सोडे, दांडी सुकट, मांदेली, ढोमे, अंबाडी सुकट, आकडी सुकट, बांगडे, सुरमई, माकली अशा विविध प्रकारची सुकी मासळी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पनवेल, अलिबाग, पेण, पाली-सुधागड या भागातील कोळी बांधव यात्रेत सुकी मासळीचा व्यवसाय करण्यासाठी दरवर्षी नित्याने येतात. मुंबई येथील मरोळ व रायगडमधील पोयनाड, मुरूड, अलिबाग येथील सुकी मासळीलाही यात्रेत विशेष मागणी असते.

फक्त सुक्‍या मासळीच्या विक्रीतून येथे दररोज लाखोंचे आर्थिक व्यवहार होतात. आठवडाअखेर, शनिवार-रविवारी यात्रेत रंगत वाढणाची शक्‍यता आहे. अनेक व्यावसायिकांची तिसरी व चौथी पिढी याठिकाणी व्यवसाय करताना दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला

Mosambi Farming : पोपटांच्या थव्यांचा मोसंबी बागांवर डल्ला!

Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे

Sugarcane FRP Price : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर करा

Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी

SCROLL FOR NEXT