Dahanu Gholwad Chiku Agrowon
ताज्या बातम्या

Dahanu Gholwad Chiku : दिल्लीतील प्रदर्शनात ‘डहाणू घोलवड चिकू’ होणार सहभागी

Chiku GI : दिल्ली ग्रेटर नोएडा इंडिया एक्सपो सेंटर येथे भारत सरकारच्या उपक्रमातून २० ते २४ जुलै या पाच दिवसांत भारतातील भौगोलिक मानांकन (Geographical Indication Fair) मिळविलल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Geographical Indication Fair : बोर्डी, जि. पालघर : दिल्ली ग्रेटर नोएडा इंडिया एक्सपो सेंटर येथे भारत सरकारच्या उपक्रमातून २० ते २४ जुलै या पाच दिवसांत भारतातील भौगोलिक मानांकन (Geographical Indication Fair) मिळविलल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

भारतात चारशेहून अधिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रदर्शनात डहाणू घोलवड येथील चिकू प्रक्रिया पदार्थाचे प्रदर्शन करण्यासाठी बोर्ड प्रक्रिया उद्योजक सहभागी होणार आहेत, त्यापैकी सुमारे एकशे तीस कृषी आधारित उत्पादनांना मानांकन प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू व घोलवड येथील चिकूला २०१६ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले आहे, परंतु चिकू फळच्या योग्य पणन प्रक्रिया व निर्यातीला हवी तशी चालना अजूनही मिळत नाही. यावर पर्याय शोधण्यासाठी मागच्या सहा वर्षांपासून डहाणू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रयोग केले असून प्रक्रिया उद्योगाला चांगले यश मिळाले आहे.

चिकूच्या वाळवलेल्या कापा व पावडर या वस्तूंना देशात व परदेशात चांगली मागणी निर्माण होऊ शकते. हे पदार्थ चिकूपासून मिल्कशेक आईस्क्रीम, कुल्फी, मिठाई यांच्यासारखे अनेक पदार्थ दैनंदिन जीवनात आहारात वापरण्यास उपयोगी ठरतात. त्यामुळे चिकू फळापासून प्रक्रिया केलेले पदार्थ भविष्यात बाजारात मोठी मागणी येऊ शकते या अनुषंगाने दिनांक २० ते २४ जुलै २०२४ या काळात दिल्ली येथे होणाऱ्या जी आय फेअरमध्ये डहाणू घोलवड चिकूचे प्रतिनिधित्व बोर्डी प्रक्रिया उद्योगात गेल्या सहा वर्षांपासून काम करीत असलेले गोल्ड ऑर्चड ही एकमेव संस्था प्रतिनिधित्व करणार आहे. चिकूपासून बनवलेल्या पदार्थांना निर्यातीस वाव मिळावा व त्याचे योग्य पणन होण्यासाठी हा राष्ट्रीय स्तरावर केलेला एक प्रयत्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT