Mandous Cyclone Agrowon
ताज्या बातम्या

Mandous Cyclone : ‘मनडूस’ चक्रीवादळ आज धडकणार

बंगालचा उपसागरात गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही वादळी प्रणाली आज (ता. ९) मध्य रात्रीपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी ते श्रीहरीकोट्टा दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागरात (Bay Of Bengal) गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची (Mandous Cyclone) निर्मिती झाली आहे. वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही वादळी प्रणाली आज (ता. ९) मध्य रात्रीपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी ते श्रीहरीकोट्टा दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे. गुरुवारी (ता. ८) दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे ४६० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.

समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या वादळाचे केंद्र ताशी ११ किमी वेगाने वायव्य दिशेकडे सरकत होते. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, श्रीलंकेत ढगांची दाटी झाली आहे.

या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रासह विविध राज्यांत ढग जमा होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT