Vegetables  Agrowon
ताज्या बातम्या

Vegetables : हिरव्या वांग्याची जाग्यावरच काटापट्टी

सुरुवातीला शेतातून निघालेली हिरवी वांगी चाळीस किलोच्या कट्ट्यामध्ये पॅकिंग करून बाजारपेठेत पाठविल्या जायची.

Team Agrowon

पथ्रोट, जि. अमरावती : सुरुवातीला शेतातून निघालेली हिरवी वांगी (Brinjal) चाळीस किलोच्या कट्ट्यामध्ये पॅकिंग करून बाजारपेठेत पाठविल्या जायची. परंतु आता बाजारपेठेतील मागणीनुसार कसरत करीत शेतकरी हिरव्या वांग्याची (Green Brinjal) जाग्यावरच काटापट्टी पॅकिंग करून देत आहेत.

नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा भर हिरव्या वांगीच्या लागवडीकडे असतो. तर महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेत या वांगीला अधिक मागणी असल्याने दररोजच हजारो क्विंटल वांगी शहराच्या मोठ्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. परंतु मागील काही दिवसांपासून इतर फळांच्या व भाजीपाल्याच्या तुलनेत कमी किलोच्या पॅकिंगला व्यापाऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

त्यामुळे स्थानिक दलाल शेतकऱ्यांपासून विकत घेतलेली वांगी स्वतः २० किलोच्या पन्नीमध्ये पॅक करून विक्रीसाठी पाठवीत आहेत. या पॅकिंगनुसार व्यापारी आपल्याला हवा तेवढाच माल ठेवतो. तर इतर माल दुसऱ्या बाजारपेठेमध्ये पाठविला जातो, म्हणून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या पसंतीनुसार होत असलेल्या हिरव्या वांग्याची पॅकिंग आता त्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांनी स्वतः तोडलेला माल हा स्वतः प्लॕस्टिकमध्ये पॅक करून जाग्यावरच त्याचे मोजमाप करून विक्री करण्यावर भर दिला आहे.

सुरुवातीपासूनच चांगला भाव मिळत असलेल्या हिरव्या वांगीचे यावर्षी अतिपावसाने अतोनात नुकसान केले. या काळात विविध प्रकारच्या कीडनाशकांची फवारणी व खतपाणी घालून जिवापाड परिश्रम घेऊन पीक काही प्रमाणात वाचवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT