Onion Seed Production Agrowon
ताज्या बातम्या

Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनामध्ये लागवड तंत्र महत्त्वाचे

या हंगामात कांदा बीजोत्पादनात अधिकाधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र महत्त्वाचे आहे,’’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन केंद्रातील कनिष्ठ पैदासकार डॉ. श्‍याम घावडे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

अकोला ः ‘‘या हंगामात कांदा बीजोत्पादनात (Onion Seed Production) अधिकाधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र (Cultivation Technique) महत्त्वाचे आहे,’’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन केंद्रातील कनिष्ठ पैदासकार डॉ. श्‍याम घावडे यांनी व्यक्त केले.

बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे चिंचोली (रुद्रायणी) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत प्रकल्प संचालक आरिफ शहा यांच्या मार्गदर्शनात कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली.

डॉ. घावडे यांनी कांदा बीजोत्पादन तसेच बियांपासून कांदा उत्पादन या दोन्ही बाबतीत विद्यापीठाचे तंत्रज्ञान, शिफारशी, लागवड पद्धती, जाती, विलगीकरण, पूर्वमशागत, कांदा बीजोत्पादन लागवड तंत्र, उत्पादनवाढ तंत्र, पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापनाबाबत सविस्तरपणे तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. दिनेश फड यांनी बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले

तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. ‘‘पंतप्रधान उन्नयन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,’’ असे आवाहन त्यांनी केले. आत्मा यंत्रणेच्या सहाय्यक तंत्र व्यवस्थापक अर्चना पेठे यांनी शेतीशाळेचे नियोजन केले. कांदा बीजोत्पादक शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषिमित्र रोशन वाघ यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT