Watermelon Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Watermelon Cultivation : रोहा तालुक्‍यात ८५.९० हेक्टरवर कलिंगडाची लागवड

रोह्यात लागवड होणाऱ्या कलिंगडला राज्‍यासह राजस्थान, गुजरात व कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. सद्यस्‍थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८५.९० हेक्टर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली आहे.

टीम ॲग्रोवन

रोहा ः रोह्यात लागवड होणाऱ्या कलिंगडला (Watermelon Cultivation) राज्‍यासह राजस्थान, गुजरात व कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. सद्यस्‍थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८५.९० हेक्टर क्षेत्रात कलिंगडची (Watermelon Market) लागवड केली आहे. व्यावसायिक दृष्‍टीकोनातून नियोजन करून हे पीक घेतले जात असल्याने शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्‍पन्नही वाढले आहे.

रोहा तालुक्यात पारंपरिक शेतीबरोबरच कडधान्य, फळभाज्‍या, कलिंगड लागवडीचे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. तालुक्यातील वाशी गावातील मगर बंधूंनी मोठ्या प्रमाणावर कलिंगड पीक घेण्यास सुरुवात केली आहे. कलिंगड पिकाला व्यावसायिक रूप दिले आहे. त्‍याचे अनुकरण करून तालुक्यातील अन्य शेतकरीही कलिंगडाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत.

योग्य नियोजन, उपलब्ध बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना कलिंगड पीक फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातील सुतारवाडी, कोलाड, बाहे, देवकान्हे, सुतारवाडी, धाटाव, चणेरा, यशवंतखार आदी भागात कलिंगड पीक घेतले जात आहे. या वर्षी कलिंगडाच्या लावगडीला सुरुवात झाली आहे.

तालुक्यात वाशी गावातील कलिंगडांना जिल्‍ह्यासह परराज्‍यातही मोठी मागणी आहे. त्‍यानुसार पुरवठा करण्याचा प्रयत्‍न शेतकरी करीत आहेत. कलिंगड व्यवसायामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

कलिंगडाची लागवड काहीशी खर्चिक आहे. हवामानाचाही यावर परिणाम होत असल्याने कलिंगड लागवडीसाठी लागणारे ब्लिचिंग पेपर बियाण्यासह पीक लागवडीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी शासनाने अनुदान द्यावे.
अनंत मगर, कलिंगड उत्पादक, वाशी- रोहा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT