Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : एक लाख १० हजार हेक्टरवर आडसाली उसाची लागवड

यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर जूनपासून ऊस लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात (Sugarcane Cultivation Acreage) वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत आडसाली उसाची (Adasali Sugarcane) एक लाख १० हजार ६४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड सरासरी ३० टक्के झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळपासाठी ऊस (Sugarcane Crushing) उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर जूनपासून ऊस लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले. विभागात ऑक्टोबरअखेरपर्यंत आडसाली उसाच्या लागवडी करता येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाचा थोड्या फार प्रमाणात खंड पडल्यामुळे ऊस लागवडी खोळंबल्या होत्या. परंतु जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला. दर वर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवडी केल्या जातात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी साखर कारखान्यास ऊस तोडणीस दिला जातो.

पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी ३ लाख ७० हजार ७८१ हेक्टर क्षेत्र आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील दौंड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांतही काही प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. तर, मुळशी, मावळ, वेल्हे, खेड हे तालुके उसाच्या लागवडींपासून दूर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यांत उसाच्या बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत, तर बार्शी, सांगोला, सोलापूर या तालुक्यांत कमी लागवडी करतात.

दृष्टिक्षेपात

जिल्हानिहाय आडसाली उसाचे क्षेत्र ( हेक्टरमध्ये)

जिल्हा ---- सरासरी क्षेत्र --- आडसाली उसाची लागवड

नगर --- १,०२,६१३ -- ५५,६१४

पुणे --- १,३०,६३१ -- ४२,९३९

सोलापूर --- १,३७,५३६ ---१२,०८८

एकूण --- ३,७०,७८१ -- १,१०,६४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT