Rain Update Kolhapur agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसामुळे घाटाखालील तालुक्यात पिकांना दिलासा

Latest Rain Update : यंदाच्या हंगामात जून आटोपल्‍यानंतर जुलै महिन्‍यात काही भागात पिकांसाठी समाधानकारक, तर काही भागात पूरपरिस्‍थिती निर्माण करणारा पाऊस झाला.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडल्याने पिकांची अवस्था बिकट बनली होती. पीक उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढत चालली होती.

यंदाच्या हंगामात जून आटोपल्‍यानंतर जुलै महिन्‍यात काही भागात पिकांसाठी समाधानकारक, तर काही भागात पूरपरिस्‍थिती निर्माण करणारा पाऊस झाला. पूर परिस्‍थिती निर्माण झालेल्‍या भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले. आता तब्‍बल महिनाभराने पावसाचे आगमन झाले. गेले तीन दिवस पडलेल्‍या पावसाने पिकांना मोठा फायदा झाला.

जिल्‍ह्यात २२ जुलैपासून ५ सप्‍टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडला होता. काही ठिकाणी मध्यंतरी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र सार्वत्रिक पाऊस नसल्याने पिके सुकली होती. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अशातच ६ सप्‍टेंबर रोजी खामगाव तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. त्‍

यानंतर ७ व ८ सप्‍टेंबरला रिमझिम पाऊस झाला. घाटाखालील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, मोताळा या तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. मलकापूर तालुक्‍यात पुन्‍हा अतिवृष्टी झाली. या तालुक्यात ७५ मिलिमीटर पाऊस पडला. नांदुरा तालुक्‍यात ५० मिमी, खामगाव तालुक्‍यात ४२ मिमी पाऊस नोंद झाली होती.

दुसरीकडे जिल्‍ह्यातील प्रकल्‍पांमधील अत्‍यल्‍प साठा ही चिंतेची बाब बनलेली आहे. उर्वरित पावसाळ्यात दमदार पाऊस झाला तरच रब्बी हंगाम तसेच उन्हाळ्यासाठी पाण्याची उपलब्धता होऊ शकेल.

खामगाव तालुक्‍यात आतापर्यंत पिकांच्‍या वाढीसाठी आवश्यक तेवढा पाऊस पडल्‍याने पिके जोमात होती. मात्र, महिनाभराचा खंड पडल्याने चिंतेचे वातावरण बनले होते. आता गेल्या तीन दिवसांत झालेल्‍या पावसाने पिकांना जीवनदान दिले आहे. योग्‍यवेळी पाऊस न आल्याने पीक उत्‍पादनात घट येणार हे मात्र निश्चित आहे.
- विकास काळे, शेतकरी, काळेगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT