Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा, दिवसा वीजपुरवठा द्यावा

बुलडाण्यात शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Team Agrowon

बुलडाणा ः शेतकऱ्यांचा पीकविमा (Crop Insurance ) भरपाई, रात्री मिळणारी वीज यांसह इतर प्रमुख समस्यांच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या वेळी शासनाविरुद्ध घोषणा देत विमा भरपाईची मागणी करण्यात आली. मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली, तीसुद्धा तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना रात्री मिळणारी वीज ही दिवसा मिळाली पाहिजे, अशा मागण्या करण्यात आल्या. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात तसेच पीकविमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजा राठोड, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, वैद्यकीय आघाडी तालुका प्रमुख डॉ. अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उपतालुका प्रमुख विजय इतवारे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT