Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा, मदतीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको

परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

टीम ॲग्रोवन

परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, (Heavy Rainfall) परतीचा पाऊस यामुळे खरीप पिकांचे मोठे (Kharip Crop Damage) नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. पीकविमा परतावा मंजूर करावा. शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ आर्थिक मदत जमा करावी, आदी मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Balasabh Thakrey Shivsena) तर्फे परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी (ता.१९) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जून, जुलै महिन्यांतील अतिवृष्टी, सततचा पाऊस, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ऐन सुगीमध्ये झालेली अतिवृष्टी आदींमुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करावेत.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक द्यावी, आदी मागण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी-जिंतूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी कुंभकर्ण येथे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला. पाथरी येथे उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अन्य तालुक्यांतही आंदोलने करण्यात आली. त्यात शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT