Crop Demonstration  Agrowon
ताज्या बातम्या

PDKV Shiwar Feri : ‘पंदेकृवि’च्या शिवारफेरीसाठी यंदा २० एकर प्रक्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके

Latest Agriculture News : यंदा प्रथमच २० एकरांत एकाच ठिकाणी विविध पिकांचे प्रात्यक्षिक बघण्याची शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिवारफेरी २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात होत असून, यंदा प्रथमच २० एकरांत एकाच ठिकाणी विविध पिकांचे प्रात्यक्षिक बघण्याची शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी गेले काही महिने विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्लॉट तयार करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेतीविषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे, अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावेत आणि शास्त्रज्ञांसोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता याव्या या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीनदिवसीय शिवार फेरीत आयोजित केली जाते.

यंदा २९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या शिवार फेरीत शेतकऱ्यांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे. यंदाच्या शिवारफेरीत ५० हजारांहूनही अधिक शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक शेतकरी शिवार फेरीत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग व इतर संस्थांनी देखील प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी (ता. २९) या शिवार फेरीचे उद्‌घाटन होणार आहे. दरम्यान, आयोजित शिवार फेरीदरम्यान प्रत्येक विभागातील व प्रक्षेत्रावरील तयारीचा आढावा कुलगुरू डॉ. गडाख यांचे अध्यक्षतेत घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने प्रथमच सप्टेंबर महिन्यात आयोजन करण्यात येणार आले आहे.

विद्यापीठाच्या गहू संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांच्या विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. एकूण २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत.

तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या जाती आहेत. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या १२ शिफारशींचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले. तसेच कंपोस्ट व गांडूळ खताचे पण प्रात्यक्षिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT