Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : खानदेशात पावसाने पिकांची नासाडी

धुळे तालुक्यातील नेर, लामकानी व इतर भागांत ज्वारी, गहू पीक आडवे झाले आहे. परंतु याबाबत प्रशासन पंचनाने करण्यास हलायला तयार नाही.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात मागील दोन - तीन दिवसांत अनेक गावांमध्ये बेमोसमी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे. यात गहू (Wheat) , मका (Maize) , दादर ज्वारी (Jowar), भाजीपाला (Vegetable) पिकांची हानी (Crop Damage) झाली आहे.

हानी किती झाली आहे, याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करून माहिती दिलेली नाही. तसेच अनेक गावांत पंचनामेही झालेले नाहीत.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी, महसूल विभागाबाबत प्रचंड नाराजी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा तालुक्यांत पावसाने हानी झाली आहे.

नवापुरातील विसरवाडी, खांडबारा भागाला रविवारी (ता.२९) पावसाने झोडपून काढले. त्यानंतर धुळ्यातील धुळे, साक्री भागातही पाऊस झाला. यात गहू आडवा झाला.

धुळे तालुक्यातील नेर, लामकानी व इतर भागांत ज्वारी, गहू पीक आडवे झाले आहे. परंतु याबाबत प्रशासन पंचनाने करण्यास हलायला तयार नाही.

कृषी विभाग व महसूल विभाग म्हणतो, नुकसान ३० टक्केही झालेले नाही. या आकडेवारीच्या खेळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे.

यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी असतानाही पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे नुकसान भरपाई मिळेल का, हा प्रश्‍न आहे. शेतकरी संकटात आहेत.

कापसाला दर नाही. त्यात रब्बी हंगाम उसनवारीने निधी आणून, उधारीची कीडनाशके, बियाणे, खते आणून उभा केला आहे. अशात शेतकऱ्यांना निधीची गरज आहे.

जळगाव जिल्ह्यात काही भागांत तुरळक पाऊस झाला आहे. कुठेही वादळ, पाऊस किंवा नुकसान झालेले नाही. परंतु ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, वेलवर्गीय पीकधारकांचे किडींच्या प्रकोपाने नुकसान झाले आहे.

पीकहाणी सुमारे एक हजार ते ११०० हेक्टरवरील पिकांचे धुळे व नंदुरबारात नुकसान झाले आहे. यात टक्केवारीची समस्या लक्षात न घेता कार्यवाही करावी व नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Irrigation Advisory: पावसाच्या खंडातील आपत्कालीन उपाययोजना

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

SCROLL FOR NEXT