Unseasonal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain News : शेतकरी अवकाळीने हैराण

प्रशासनाच्या नोंदीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ८.९ मिलिमीटर, जालना ३.६, बीड ०.८, लातूर १.५, धाराशिव ०.१, नांदेड ४.७, परभणी ३.५ तर हिंगोली जिल्ह्यात ५.५ मिलिमीटर पाऊस झाला.

Team Agrowon

Maharashtra Rain Damage : मराठवाड्यात वादळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. बुधवारी (ता. ३) मध्यरात्रीनंतर व गुरुवारी (ता. ४) सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांतील काही ठिकाणी पाऊस बरसला. सततच्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे.

प्रशासनाच्या नोंदीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ८.९ मिलिमीटर, जालना ३.६, बीड ०.८, लातूर १.५, धाराशिव ०.१, नांदेड ४.७, परभणी ३.५ तर हिंगोली जिल्ह्यात ५.५ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील मंठा व घनसावंगी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. ४) सकाळी जोरदार पाऊस झाला.

छत्रपती संभाजी नगर शहरासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील लोहगाव बालानगर, लातूर जिल्ह्यातील जळकोट शहर व तालुक्यात पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे लग्नकार्यातील वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. गुरुवारी विद्युतपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात वारा असल्यामुळे काही जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाले.

गावरान आंबा गायब

जळकोट तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस दणका देत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामाचा खोळंबा झाला. वाऱ्यामुळे गावरान आंब्यांच्या झाडाचा आंबा गायब झाला आहे. शेतकरी अवकाळी पावसामुळे हैराण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT