Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage News : राबराब राबून पिकविलेले पीक दिवसागणिक मातीमोल

Unseasonal Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ६० मंडलांत गुरुवारी (ता. ४) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वादळी पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani Crop Damage : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ६० मंडलांत गुरुवारी (ता. ४) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वादळी पाऊस झाला.आंबा, लिंबू, केळी, कांदा, उन्हाळी पिके, भाजीपाला यासह शिजवून शेतात वाळवत घातलेली हळद (Turmeric) भिजल्याने मोठे नुकसान झाले.

गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नुकसानीत भर पडत आहे. राबराब राबून पिकविलेले पीक दिवसागणिक मातीमोल होत आहे.

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता.३) दुपार नंतर ३५ मंडलांत वादळी पाऊस झाला. परभणी, परभणी ग्रामीण, झरी, टाकळी कुंभकर्ण मंडलांत, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, सावंगी, म्हाळसा, चारठाणा, वाघी, धानोरा, सेलू तालुक्यांतील सेलू, वालूर, चिकलठाणा, मोरेगाव मंडलांत, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, पिंपळदरी, पालम तालुक्यातील पालम, बनवस, पेठशिवणी मंडलात, पूर्णा तालुक्यातील पूर्णा, ताडकळस, लिमला या मंडलात पावसाचा जोर राहिला.

हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडलात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, बासंबा, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, वसमत, हयातनगर, टेंभुर्णी, कुरुंदा, येळेगाव, सेनगाव, साखरा या मंडलात पावसाचा अधिक जोर राहिला.

फळझाडे उन्मळून पडली

‘‘वादळी पावसामुळे फळझाडे उन्मळून पडली. हाती आलेल्या आंबा, लिंबू आदींची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. वळई (गंजी)तील ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्या विस्कटून पडल्या. अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहे,’’ असे कौडगाव (ता. परभणी) येथील शेतकरी अरुण चव्हाळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Farm Loan Waiver: तीस जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री भरणे

SCROLL FOR NEXT