Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : साहेब, पंचनाम्यासाठी पीक पाण्यात ठेऊ का?

उभ्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे बहूतेक ठिकाणी अद्याप झालेले नाहीत.

टीम ॲग्रोवन

सांगोला : ‘साहेब,अहो तुमच्या पंचनाम्यासाठी थोडंफार राहिलेलं पिकं ते पण पाण्यातच ठेवू का? द्यायचं असेल तर सरसकट नुकसान (Crop Insurance) भरपाई द्या, नाहीतर राहू द्या म्हणाव सरकारला !’ अशा संतापजनक प्रतिक्रिया आहेत सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीने (Wet Drought) पिचलेल्या शेतकऱ्यांच्या.

अतिवृष्टी झाली. यामध्ये उभ्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे बहूतेक ठिकाणी अद्याप झालेले नाहीत. एकीकडे पंचनामे होत नाहीत अन्‌ दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून थोडेफार राहिलेले पीक पाण्यात आहे. ते पीकपण काढता येईना. तालुक्यात पंचनाम्यांचा घोळ आहे. वरातीमागून घोडे असा खराखुरा प्रकार आहे.

सांगोला तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. तालुक्यातील सर्वाधिक १७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेल्या संगेवाडी मंडलामध्ये महसूल व कृषी अधिकारी पंचनामे करताना शेतकरी अधिकाऱ्यांना बोलत होते. अनेक शेतकऱ्यांचे शेतात सध्या पीकच नसल्याने पंचनामे करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

तर शेतकऱ्यांनी पाऊस संपल्या संपल्या पाण्यात असलेली पिके काढून घेतल्याने त्यांचे पंचनामे करणार कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून पंचनाम्याचे काम म्हणजे वराती मागून घोडे असा प्रकार असल्याचे सद्य परिस्थितीत दिसून येत आहे.

या तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले. काढणीला आलेली पिके वाया गेली. तालुक्यात या अगोदरच डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याने सूर्यफूल, मका इत्यादी पिके मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. परंतु, ही पिके मातीमोल झाली.

शासकीय नियमानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत त्यांनी स्थानिक पातळीवरील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शासनाचा आदेश जसा येईल त्याप्रमाणे नुकसानभरपाईचा अहवाल तयार करण्यात येईल

- अभिजीत सावर्डे - पाटील,

तहसीलदार, सांगोला.

सध्या पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे केले जात आहेत

- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT