Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : धुळे जिल्ह्यात पावसाने पीकहानी

धुळे : जिल्ह्यात पावसाने साक्री व शिरपूर तालुक्यात पीकहानी सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंत्रणांनी पंचनामेच कुठेही केलेले नसल्याची स्थिती आहे.

टीम ॲग्रोवन

धुळे : जिल्ह्यात पावसाने साक्री व शिरपूर तालुक्यात पीकहानी (Crop Damage) सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंत्रणांनी पंचनामेच (Crop Damage Survey) कुठेही केलेले नसल्याची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. १) मध्यरात्री व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. कापूस पिकाचे अधिकचे नुकसान झाले आहे. उडदालाही फटका बसला आहे. साक्रीतही कांदा, कपासाचे नुकसान झाले आहे. शिरपुरात नुकसानग्रस्त क्षेत्राची आमदार काशिराम पावरा यांनी पाहणी केली. कृषी विभागासह पीकविमा कंपनीने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना त्यांनी दिल्या.

धुळे तालुक्यातील धनूर, तामसवाडी, कौठळ, जापी, शिरडाणे, विश्‍वनाथ, न्याहळोद, धमाणे, बिलाडी नगाव, तिसगाव, ढंढाणे, सरवड, सायने, देवभाने शिवारात गुरुवारी पहाटे पावणेचारपासून मुसळधार पाऊस झाला. दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. येथील भात नदीला दुसऱ्यांदा मोठा पूर आला.

शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द, अर्थे बुद्रुक, चांदपुरी, भरवाडे, जातोडे, टेंभे, वनावल परिसराला मुसळधार पावसाचा फटका बसला. तेथील शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच आमदार पावरा यांनी परिसराचा दौरा केला. प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली. शेतांमधूनच प्रशासनाशी संपर्क साधून मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याची योग्य नोंद करावी, पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हवामान विभागाच्या रडारच्या नोंदी तपासून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

या हानीत फळपिके, केळी, ऊस, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुगासह खरीप पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांनी दिले. पाहणी करतेवेळी के. डी. पाटील, माजी उपसभापती दीपक गुजर, भरत पाटील, बन्सीलाल चव्हाण, शालिक पाटील, डॉ. शशिकांत पाटील, नारायण पाटील, कल्याण पाटील, श्याम शिरसाठ, लिलाचंद पाटील, प्रवीण पाटील, किरण गुजराथी, राजधर पाटील, अंबालाल पटेल, विलास पटेल, एकनाथ पटेल, महेंद्र पटेल आदी उपस्थित होते.

हातातोंडाशी हंगाम आला आणि...

पाऊस सुरूच राहील्यास पुढे उडदाचे नुकसान वाढेल. तसेच कापूस पिकात फूल, पातेगळीची समस्या तयार होईल. यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीवरील उत्पादन खर्चही वाढेल. गुरुवारी दुपारी व रात्रीही पाऊस झाल्याने हानी वाढली आहे. शुक्रवारीदेखील (ता.२) पावसाळी वातावरण होते. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण पूर्वहंगामी कापसाचे पीक हातातोंडाशी आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT